वाराणसीत राहुल गांधींचाही ‘हाऊसफुल्ल शो’

May 10, 2014 3:12 PM0 commentsViews: 1625

amethi_rahulgandhi10 मे : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही वाराणसीमध्ये ‘हाऊसफुल्ल’ रोड-शो झाला. गोलगड्डापासून सुरू झालेला भव्य रोड शो हा लंका गेट इथं संपला.

सकाळी गोलगड्डापासून सुरू झालेला रोड शो शहरात लहुराबीर मार्गे लंका गेटपर्यंत आयोजित करण्यात आला होता. या रोड शोला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. राहुल गांधी एका खुल्ल्या ट्रॅकमध्ये स्वार झाले होते आणि समर्थकांना हात उंचावून अभिवादन करत होते. राहुल यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

लंका गेटवर पोहचल्यानंतर राहुल गांधींनी बनारस हिंदू विद्यापीठाचे मदन मोहन मालविया यांच्या पुतळ्याला हार घातला. या रोड शोमध्ये काँग्रेसचे नेते गुलाम नवी आझाद, राशीद अल्वी, राज बब्बर यांच्या इतर नेते सहभागी होते. भाजप आणि आम आदमी पार्टीप्रमाणे काँग्रेसनं कार्यकर्ते बाहेरुन आणले नाहीत, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

दरम्यान, निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप भाजपने पुन्हा एकदा केलाय. मोदींना ज्या ठिकाणी सभेसाठी परवानगी नाकारली होती, त्याच भागात राहुल गांधींनी कशी परवानगी दिली, असा सवाल भाजप नेते अरुण जेटली यांनी उपस्थित केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close