मिरची झोंबली, सौदीत 30 मेपासून आयातीवर बंदी

May 10, 2014 3:04 PM2 commentsViews: 1327

767mirchi4510 मे : हापूस आंब्यापाठोपाठ आता मिरच्यांवरही संक्रांत आलीय. सौदी अरेबियाने भारतीय मिरच्यांच्या आयातीवर 30 मे पासून बंदी जाहीर केली आहे. मिरच्यांच्या लागवडीत प्रमाणाबाहेर कीटकनाशकांचा वापर होत असल्याने ही बंदी घातल्याचे सौदी अरेबियाच्या कृषी खात्यानं स्पष्ट केलंय.

हापूस आंब्यावर 28 युरोपीय देशांनी 1 मे रोजी बंदी घातल्यानंतर हा दुसरा मोठा धक्का शेतमालाच्या देशी उत्पादकांना बसला आहे. भारतातून आलेल्या भाज्या व मिरच्यांची चाचणी सौदी अरेबियाने घेतली. तेव्हा उत्पादन घेताना मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर झाल्याचे हिरव्या मिरच्यांच्या काही चाचण्यांतून स्पष्ट झाले.

त्यानंतर या आयातबंदीचा निर्णय सौदी कृषी मंत्रालयाकडून भारतीय कृषी आणि अन्नप्रकिया उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाला कळविण्यात आला. जर कीटकनाशकांचा असाच वापर सुरू राहिला तर भविष्यातही ही बंदी कायम राहील असं सौदी अरेबियाने स्पष्ट केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Anand Patekar

    मिरच्यांच्या लागवडीत प्रमाणाबाहेर कीटकनाशकांचा वापर होत असल्याने भारतात सुध्‍दा बंदी असावी

  • bhavusaheb

    आमच्या सरकारचे डोळे कदी उघडनार हे ईत का होवु षेकत विचार करायची गोष्ट आहे

close