वाराणसीत ‘सायकल’ही सुसाट, अखिलेश यांचंही शक्तिप्रदर्शन

May 10, 2014 3:43 PM2 commentsViews: 886

akhilesh_yadav_varansi10 मे : लोकसभा निवडणुकीच्या नवव्या टप्प्यातल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वाराणसीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा जंगी रोड शो आणि सभा झाली. त्यापाठोपाठ सपानेही वाराणसीमध्ये आपली सायकल ‘सुसाट’ पळवलीय.

समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही रोड शो घेतला. वाराणसीत सपाचे उमेदवार कैलाश चौरसिया यांच्या प्रचारासाठी तीन तासांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. मोदींना प्रत्युत्तर देण्यासाठी अखिलेश यादव स्वत: या रॅलीत सहभागी झाले होते.

दुपारी वाराणसीतील पिली कोठीच्या इंटर कॉलेजपासून ही रॅली सुरू झाली होती. शहरात विश्वेश्वरगंज, मैदागीन, लहुरावीर, गोदौलिया आणि शिवाला मार्गे बनारस हिंदू विश्व विद्यालयाच्या मुख्य गेटजवळही रॅली संपली. भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा दावाही अखिलेश यादव यांनी केला. वाराणसीच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 12 तारखेला वाराणसीत मतदान होणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल यासारखे दिग्गज रिंगणात असल्यानं वाराणसीतली ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ishwarlal J. Maurya

    chunav k samay vote k liye kisi chij ka pralobhan dena aachar sanghita ka ulanghan hai

  • Ishwarlal J. Maurya

    kisi visesh karya k liye kisi visesh jati samuday k bare me bate karana , kisi visesh jati samuday ko suraksha yevam visesh adhikar dena … vagerah vegarah .. sampradaikata hai

close