निवडणुकीच्या रिंगणात स्टारवॉर जोरात सुरू

April 7, 2009 12:17 PM0 commentsViews: 7

7 एप्रिलसिनेस्टार्सना मैदानात उतरवल्यानं मतं मिळवणं सोपं जाईल, असा विचार राजकीय पक्षांनी केला आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या रणधुमाळीत आता स्टार वॉर पाहायला मिळणार आहे. मूव्हर आणि शेकर्स फेम शेखर सुमनला काँग्रेसनं बिहारमधल्या पटनामधून तिकीट दिलं आहे. त्याच्याविरोधात भाजपकडून शत्रुघ्न सिन्हा रिंगणात आहेत. पण अभिनेत्यांना नेता बनावसं का वाटतंय का, हा प्रश्न सतावत आहे. ' माझे वडील पार्किन्सन डिसिजनं त्रस्त आहेत. गेल्या आठवड्यात मी त्यांच्यासोबत बसलो होतो. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आतापर्यंत तू जे काही मिळवलंस त्याची आता बिहारच्या लोकांना परतफेड करायची आहे. त्यामुळेच मी प्रेरणा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आलो आहे, असं काँग्रेसचा उमेदवार शेखर सुमन म्हणाला. समाजवादी पक्षानंही लखनौमधून संजय दत्तच्या जागी अभिनेत्री आणि माजी ब्युटी क्वीन नफीसा अली यांना उमेदवारी दिली आहे. ' मी लखनौमधून निवडणूक लढवतेय. कारण देशात वाढत असलेल्या जातीय शक्तींमुळे मला काळजी वाटतेय. मला वाटतं मुलायम सिंग आणि अमरसिंग यांना लोकांच्या समस्यांची चांगली जाणीव आहे, असं समाजवादी पक्षाच्या उमेदवार नफीसा अली यांचं म्हणणं आहे.दक्षिण मध्य मुंबईतून काँग्रेसच्या सध्याच्या खासदार प्रिया दत्त यांच्याविरोधात सुप्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी भाजपकडून रिंगणात उतरलेत. मुंबई हल्ल्यानंतर काहीतरी करण्याची गरज आहे, याची जाणीव झाल्याचं महेश यांनी सांगितलंय. ' जर देशाची सुरक्षा विश्वास ठेवण्यासारखी नसेल, तर परिस्थिती आपल्या हाती घेण्याची वेळ आल्याचं समजावं. संसदेत चांगले विधेयक आणून मी चांगला संसदपटू होईन असा मला विश्वास आहे, असं भाजपचे उमेदवार महेश जेठमलानी यांचं म्हणणं आहे. काही स्टार खासदारांचा अपवाद वगळता इतरांनी निराशाच केलीय. गोविंदा आणि धर्मेंद्र ही त्याची चांगली उदाहरणं आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठीच सेलिब्रिटीजना उमेदवारी देण्याचा झपाटा सर्वच पक्षांनी लावला आहे. गोविंदा आणि धर्मेद्र यांच्या पाठोपाठ आता निफासा अली, शेखर सुमन, शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीच्या प्रचार सभेत उतरले आहेत. पण मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही राजकीय चाल कितपत उपयोगी ठरेल, हा प्रश्न आहे.

close