बँकेची दिवाळखोरी जाहीर केल्याने ठेवीदारांना झटका

May 11, 2014 10:13 AM0 commentsViews: 179

PEN-BANK-1024x68211 मे :  कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे वादात सापडलेली पेण अर्बन बँक दिवाळखोरीत निघाली आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण असतानाच सहकार खात्यानं दिवाळखोरी जाहीर करून ठेवीदारांना झटका दिला आहे. सुमारे 700 कोटींच्या घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध घातले होते. त्यामुळे 2 लाख ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकल्या आहेत.

बँकेत अडकलेली ठेवी परत मिळावण्यासाठी ठेवीदारांनी खातेदार संघर्ष समितीमार्फत मुंबई हायकोर्ट, रायगड जिल्हा कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यादरम्यानच रिझर्व्ह बँकेनं पेण अर्बन बँकेचा बँकिंग परवानाही रद्द केला आहे. याविरोधातल संघर्ष समितीनं अर्थमंत्रालयात केलेलं अपीलही फेटाळण्यात आलं आहे. आता सहकार खात्याने दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे ठेवीदार चांगलाचं धक्का बसला आहे. याचा विरोधात करत ठेवीदार 13 मे रोजी संघर्ष समितीच्या कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढणार आहे.

close