प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

May 11, 2014 1:45 PM2 commentsViews: 2545

CrimeScene211 मे : बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील्या जवळबन इथे दलित समाजातील एक अल्पवयीन मुलीन प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या प्रियकरास घरच्यांनी विरोध केला ही बाब सहन न झाल्यान मुलीन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे पण मुलीचे नातेवाईक मात्र आपल्या मुलीवर अत्याचार झाला असल्याच सांगत आहेत.

मुलीच्या प्रियकरास घरच्यांनी विरोध करुन त्याला जेलमध्ये पाठवल, हे सहन न झाल्यान या मुलीन आत्महत्या केली. पण मुलगी ही अल्पवयीन होती. तिला फसवल गेल असल्याची भावना मुलीच्या आई-वडीलांची असून त्या मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

राज्यात दलित समाज हा सुरक्षित नसून या समाजावर सातत्यान अन्याय होत असून हा अन्याय थांबवण्यासाठी सरकारन आता एसआयटी स्थापन करुन या मार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशीही करण्याची मागणी दलित विकास मंचचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.

वाढत्या दलित अत्याचाराच्या घटनांवर विशेष न्यायालय तसच चौकशीसाठी विशेषदल एवढ करुनही खरोखर दलित अत्याचार थांबतील का हाच खरा प्रश्न आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Anand Patekar

    दलित अत्याचाराच्या घटनांवर विशेष न्यायालय तसच चौकशीसाठी विशेष दल स्‍थापन करा

  • Anand Patekar

    राज्यात दलित समाज हा सुरक्षित नसून या समाजावर सातत्यान अन्याय होत असून हा अन्याय थांबवण्यासाठी सरकारने दलित अत्याचाराच्या घटनांवर विशेष न्यायालय तसच चौकशीसाठी विशेष दल स्‍थापन करावेत

close