संगीत मत्स्यगंधाची पन्नाशी

May 11, 2014 3:52 PM0 commentsViews: 298

11 मे :  संगीत मत्स्यगंधा या नाटकाला यंदा पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्या नाटकातल्या जुन्या कलाकारांचा सत्कार नुकताच पुण्यात पार पडला. पुण्यात भरत नाट्य संशोधन मंडळाच्या वतीनं सुरु असलेल्या संगीत नाट्यमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ह्या कलाकारांचा सत्कार पार पडला. ज्येष्ठ गायक रामदास कामत आणि मत्स्यगंधा हे समीकरण म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच असायची. संगीत नाट्यमहोत्सवाचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close