लालूंना रासुका लावा – शिवसेनाप्रमुख

April 8, 2009 5:48 AM0 commentsViews: 2

8 एप्रिल, मुंबईभाजप नेते वरूण गांधी यांच्यावर रोलर चालवण्याची भाषा करणार्‍या लालूप्रसाद यादव यांना रासुका लावावा, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. ही मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना' ला दिलेल्या मुलाखतीच्या चौथ्या भागात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत 'सामना'तून प्रसिद्ध होत आहे. त्या मुलाखतीतून ते रोज निरनिराळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करतात. बाळासाहेबांनी ' सामना'ला दिलेल्या मुलाखतीतून लालूंच्या वक्तव्यांवर प्रकर्षाने टीका केली आहे. या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्याबद्दल लालूंना तात्काळ अटक करण्याची मागणीही शिवसेनाप्रमुखांनी केली आहे. तशी मागणी केल्यावर बाळासाहेब ठाकरे पुढे असंही म्हणाले आहेत की, आपल्या भाषणात वरूण यांनी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. पण लालूंनी वरूण यांचं नाव घेऊन चूक केली आहे. तेव्हा त्यांना शिक्षा झाली पाहिजे.

close