सूर्योदय पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दरी कोसळून मृत्यू

May 11, 2014 7:36 PM0 commentsViews: 1972

09kolhapur_news11 मे : कोल्हापूरजवळच्या मसाई पठारावर सूर्योदय पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दरीत कोसळून दुर्देवी अंत झाला. डॉ.सोहम लावंड असं या तरुणाचं नाव आहे. सोहम आज (रविवारी) सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी गेला असताना तो दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

सोहमसोबत गेलेले दोन मित्र डॉ.उत्कृष्ट दुधवाल (30) डॉ. सुरेश पार्थिव (30) हेही किरकोळ जखमी झाले आहेत. हे तिघंही कोल्हापूरच्या डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

सोहम लावंडचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानं पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी कोल्हापूर पोलीस अधिक तपास करत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close