एका आईची ‘हॅपी’ गोष्ट !

May 11, 2014 11:07 PM0 commentsViews: 3066

गोविंदा वाकडे, पिंपरी

11 मे : आजही पुरोगामी समाजात कुमारी मातृत्व, खोटी प्रतिष्ठा यामुळे नवजात अर्भकांना बेवारस सोडून देण्याचे प्रकार वाढत चालले आहे. पण पिंपरी-चिंचवड परिसरात एका तृतीयपंथीयाने एका मुलाला वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या मातृदिनाच्या निमित्ताने याच अनोख्या मातृत्वाची ओळख…

हा आहे हॅपी…नावाप्रमाणे सर्वत्र आनंद पसरविणारा हा चिमुकला एका तृतीयपंथीयाचा मुलगा आहे. हॅपीच्या जन्मानंतर त्याचं पालनपोषण सुनीलभाऊंनी केलंय. केवळ पालनपोषणच नाही तर त्यांनी हॅपीला आईचं प्रेमही दिलंय. सोलापुरातली एक गर्भवती स्त्री आपलं आयुष्य संपवणार होती. पण तिला धीर देऊन सुनीलभाऊंनी तिचं बाळंतपण केलं आणि त्यानंतर हॅपीचं पालकत्व स्वीकारलं. तृतीयपंथी असूनही हॅपीचा एका आईप्रमाणेच सांभाळ केल्याचा सुनीलभाऊंना अभिमान वाटतो.

सुनीलभाऊ एकट्या हॅपीचेच पालक नाही, तर अनेक तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते अविरत प्रयत्न करत असतात. त्यातूनच घडला हा किरण..(तृतीय पंथीय). सुनीलभाऊंमुळे किरणला जगण्याची उमेद मिळालीय.

सुनीलभाऊंचं हे कार्य अर्भकांना उकीरड्यावर फेकून देणार्‍या अनेकांसाठी डोळ्यात अंजन घालणारं आहे. मातृदिनाच्या निमित्ताने सुनीलभाऊंच्या कार्याला आयबीएन लोकमतचा सलाम.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close