पवार ओरिसात तिसर्‍या आघाडीच्या सभेत

April 8, 2009 8:15 AM0 commentsViews: 2

8 एप्रिल 3 एप्रिल रोजी झालेल्या तिसर्‍या आघाडीच्या सभेकडे पवार यांनी ऐनवेळी पाठ फिरवली होती. पण आज ते स्वत:हून ओरिसात तिसर्‍या आघाडीच्या सभेत जाताहेत. ते नवीन पटनायक यांच्यासोबत संयुक्त सभा घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. चर्चेच्या अनेक फेर्‍यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. पवारांनी तिसर्‍या आघाडीच्या सभेत भाग घेण्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. तर त्यानंतर तिसरी आघाडी हा एक फार्स असल्याचंही काँग्रेस आणि भाजपनं म्हटलं होतं. त्यामुळे पवारांची आजची ओरिसा भेट ही या टीकेला उत्तर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

close