वाराणसीतही मतदार याद्यात घोळ, बोगस मतदानाची आरोप

May 12, 2014 1:08 PM0 commentsViews: 552

pune_voter_issiue12 मे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ झाला होता. तसाच घोळ वाराणसीमध्येही झालाय. मतदार यादीतून मतदारांची नावं गायब झाल्याचे प्रकार समोर आले आहे.

वाराणसीतील मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेले असता मतदान यादीतच नाव नसल्याचं समोर आलं. वाराणसीमध्ये बंगाली टोला, मदनपुरा, बेनिया बाग आणि पुरानी काशी या भागात हा प्रकार झालाय. मतदार यादीत नावं नसल्यामुळे अनेक मतदारांना मतदानच करता येत नाहीये.

एवढेच नाहीतर काही मतदारांनी बोगस मतदानाचा आरोपही केलाय. आपल्या नावावर आधीच मतदान झाल्याचं या मतदारांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मतदारांनी स्थानिक निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close