होमलोनच्या नावावर लोकांची फसवणूक करणारा ठग गजाआड

April 8, 2009 11:27 AM0 commentsViews: 11

8 एप्रिल, मुंबई अजित मांढरेआपल्याला हक्काचं घर असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या स्वप्नासाठी काही पदरमोड करतात तर बहुतेकजण कर्ज काढतात. घरांच्या कर्जासाठी कर्जदारांना फसवू नये याकरता पोलिसांनी होम लोनच्या नावावर फसवणूक लोकांची फसवणूक करणा-या महाठगाला अटक केली आहे. सुधाकर हर्दनकर असं त्यांचं नावं असून त्याला पोलिसांनी त्याला कुर्ल्यातून अटक केली आहे. आतापर्यंत त्याने अनेकांना लाखो रुपयांसाठी गंडांतर घातलं आहे. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला सुधाकर हर्दनकर हा युवक एक शातीर चोर आहे. ज्या व्यक्तीला होम लोन पाहिजे अशा व्यक्तींकडून सुधाकर 10 टक्के दलालीच्या नावावर एक ब्लँक चेक घ्यायचा आणि तो चेक तो थर्ड पार्टीच्या नावे कॅश करायचा. तसंच होमलोनसाठी लागणारी कागदपत्र मिळाल्यानंतर ती कागदपत्र वापरून सुधाकर वेगवेगळी सिमकार्ड विकत घ्यायचा. त्यामुळं फोनवर झालेल्या व्यवहारातही सुधारकरचं नावं कुठेच यायचं नाही. गेल्या काही दिवसांपासून 25 वर्षांचा सुधाकर बेरोजगारीला तोंड देत होता. त्यातून तोडगा काढण्यासाठी त्याने होम लोन देण्याच्या नावावर त्यानं लोकांना लाखो रुपयांसाठी फसवलं. आपणं कोणत्याही प्रकरणात अडकू नये याकरता त्यानं, जी युक्ती लढवली होती. त्या युक्तीमुळेच तो फसला आणि पोलिसांनी त्याला गजाआड केलं. त्याला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

close