गडचिरोली नक्षली हल्ल्यातील शहिदांना अखेरचा सलाम

May 12, 2014 2:36 PM0 commentsViews: 613

12 मे : गडचिरोलीमध्ये रविवारी नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या 7 पोलिसांना गडचिरोलीच्या पोलीस मैदानावर भावपूर्ण वातावरणात शासकीय सलामी देण्यात आली. काल चामोर्शी तालुक्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या स्फोटात पोलिसांची टाटा सुमो उडवली.  त्यात 7 पोलीस जवान शहीद झाले, तर दोघे जखमी झाले. यावेळी पोलीस महासंचालक संजीव दयाल, नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख अनुपकुमार सिंग तसंच नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नरेंद्र कदम आणि राज्य विशेष गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला उपस्थित होत्या. शहिदांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फेर्‍या झाडून सलामी देण्यात आली. त्यावेळी उपस्थित शहीदांच्या कुटंुबांना अश्रू अनावर झाले. शहिदांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले आहेत. परभणीतला शहीद जवान मुंडे यांचे पार्थिव हेलिकॉप्टरनं गंगाखेड या मूळ गावी पाठवण्यात आलं. दरम्यान, गृहमंत्री गृहमंत्री आर आर पाटील सांगलीहून गडचिरोलीकडे निघाले आहेत. संध्याकाळी ते शहिदांच्या कुटुंबाची भेट घेतील.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close