मोदींचं मतदारांना आवाहन,काँग्रेसची आयोगाकडे तक्रार

May 12, 2014 4:18 PM0 commentsViews: 1845

12 मे : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मतदानाच्या दिवशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोदींनी एएनआय (ANI)या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भरघोस मतदान करा खास करून काशीच्या जनतेनं. काशी ही शांतता, सद्भावना, एकतेसाठी अशी ओळख आहे. गंगेच्या सानिध्यातलं हे शहर आहे. त्यामुळे इथल्या जनतेनं मतदानाचा हक्क बजावा. प्रत्येक व्यक्तीला आपला उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे देशाचं नेतृत्व कुणाच्या हाती द्यायचं यासाठी मतदान करावं असं आवाहनही मोदींनी दिलं. मात्र मतदानाच्या दिवशी असा व्हिडिओ मेसेज देणं, हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. या व्हिडिओवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय. टीव्ही चॅनल्स आज मोदींचं भाषण कसं काय दाखवू शकतात? हा आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगानी याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी ट्विटरवर केलीय. तर आम आदमी पक्षानंही मोदींच्या या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close