बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

May 12, 2014 4:12 PM0 commentsViews: 1208

56bombay_hospital12 मे : मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाने दुसर्‍या रुग्णावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

आज (सोमवारी) सकाळी ही घटना घडली. सलाईन लावण्यासाठी वापरण्यात येणार्‍या लोखंडी रॉडनं केलेल्या या हल्ल्यात तीन रुग्ण जखमी झाले. जखमी झालेल्या रुग्णापैकी लीलाबिहारी ठाकूर या रुग्णाचा मृत्यू झाला.

हल्लेखोर रुग्ण हा मानसिक रूग्ण असल्याचं सांगितलं जातंय. त्याला आता जेजे हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलंय. सकाळी हल्ला झाला त्यावेळी वार्डमध्ये कुणीही सुरक्षा रक्षक नव्हता अशीही माहिती पुढ आल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close