पोस्ट पोल सर्व्हे :एनडीए राखणार दिल्लीचे तख्त, यूपीए पराभवाच्या छायेत !

May 12, 2014 10:49 PM0 commentsViews: 4990

68national_poll12 मे : सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा आज शेवट झाला. ईव्हीएम मशीनमध्ये दिग्गजांचं भवितव्य बंद झालंय. 16 मे रोजी अंतिम निकाल जाहीर होणार आहे. पण देशात कुणाची सत्ता येणार ? कोण होणार पंतप्रधान ? यासाठी सर्वच एक्झीट पोल, पोस्ट पोल सर्व्हे प्रसिद्ध होत आहेत.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी म्हणजेच CSDS ने आयबीएन नेटवर्कसाठी पोस्ट पोल सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार केंद्रात ‘मोदी सरकार’ येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या सर्व्हेनुसार 543 जागांपैकी एनडीएला तब्बल 270 ते 282 जागा मिळतील. तर गेली दहा वर्ष सत्ता उपभोगणार्‍या यूपीए सरकारला 92 ते 102 जागा मिळतील.

पक्षनिहाय सर्व्हे पाहिला तर भाजप 230 ते 242 जागा पटकावेल आणि काँग्रेसला 72 ते 82 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. एकंदरीत ‘अब की बार मोदी सरकार’ यावर शिक्कामोर्तब होणार असंच चित्र आहे. इतर पक्षांनुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 25 ते 31 जागा मिळतील, अण्णा द्रमुक 22 ते 28, डावी आघाडी 14 ते 20, समाजवादी पार्टी 13 ते 17, बिजू जनता दल 12-16,वायएसआर (YSR) काँग्रेस 11 ते 15, बसप 10 ते 14, तेलंगणा राष्ट्र समिती 8 ते 12, द्रमुक + 7 ते 11 आणि आम आदमी पार्टीला 3 ते 7 जागा मिळतील.

जागांचा अंदाज एकूण जागा – 543

 • एनडीए – 270- 282
 • यूपीए – 92-102
 • तृणमूल काँग्रेस – 25-31
 • अण्णा द्रमुक – 22 – 28
 • डावी आघाडी – 14-20
 • सपा – 13-17
 • बिजू जनता दल – 12-16
 • YSR काँग्रेस – 11-15
 • बसप – 10-14
 • तेलंगणा राष्ट्र समिती – 8-12
 • द्रमुक + – 7 -11
 • आप – 3-7

==============================================================================

पक्षनिहाय जागांचा अंदाज – एकूण जागा – 543

 • भाजप – 230 – 242
 • काँग्रेस – 72-82
 • तेलुगु देसम पार्टी – 12-16
 • शिवसेना – 10 -14
 • राजद – 8 – 12

==============================================================================

मतांची अंदाजे टक्केवारी

पक्ष 2009     मतदानापूर्वी मतदानानंतर
काँग्रेस 28.6%           25% 22%
काँग्रेस+          4.2%        3% 3.5%
भाजप 18.8% 35% 34%
भाजप+ 7.5% 5% 6.5%
बसप 6.2% 4% 4.5%
डावे 7.6%   4% 4%
सपा 3.4% 4% 3.5%
आप —-   3% 3%
इतर 23.7%   17% 19%

==============================================================================

आघाड्यांची मतांची अंदाजे टक्केवारी

पक्ष    2009 मतदानापूर्वी मतदानानंतर
यूपीए 32.8% 28% 25.5%
एनडीए 26.3%   40% 40%
इतर 40.9%   32% 34%

 

==============================================================================
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close