शेअर बाजारातही ‘नमो नम:’, सेन्सेक्स 24000च्या पार

May 13, 2014 11:58 AM0 commentsViews: 802

sensex13 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी जाहीर झालेल्या ‘एक्झिट पोल’चा परिणाममुंबई शेअर बाजारात पहायला मिळाला.

 मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आज  सकाळी 24,000चा टप्पा गाठला आहे. बाजार सुरू होताचा सेन्सेक्स 370.91 अंकांनी वाढून 23,921 वर पोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही 7100 ची लेव्हल पार करून ट्रेड होत आहे. गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने ऊर्जा, वाहन उद्योग, कॅपिटल गुड्‌स, बॅंका, एफएमसीजी आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांना पसंती दिली.

दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 45 पैशांनी वधारले असून एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 59.60 इतकी झाली आहे.
close