संगीत शारदाचा प्रयोग रंगला विनोद जोशी नाट्यमहोत्सवात

April 8, 2009 1:59 PM0 commentsViews: 45

8 एप्रिल माधुरी निकुंभ हल्ली संगीत नाटकं येत नाहीत अशी बर्‍याच मंडळींची तक्रार असते. पण विनोद दोशी नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने रविंद्र नाट्यमंदिरात 115 वर्ष जुन्या संगीत शारदा या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली. या नाटकात सगळे नवे कलाकार आहेत. भारतीय रंगभूमीला संगीत नाटकांची मोठी परंपरा लाभली आहे. आणि त्या पैकीच एक म्हणजे 115 वर्ष जुनं नाटक संगीत शारदा. हे संगीत नाटक जवळ जवळ 115वर्ष जुनं आहे . या नाटकासाठी नेपथ्य, कॉस्च्युम, मेकअप यावर बरीच मेहनत घेण्यात आली आहे. पद्यातून हे नाटक पुढे सरकतं. पण बोली भाषेतल्या गाण्यांमुळे ते सहज समजतं.विनोद जोशी नाट्यमहोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना संगीत नाटकाचा चांगला अनुभव घेता आला.

close