आसाम बॉम्बस्फोट संशयितात विद्यार्थ्याचा फोटो – पोलिसांचा हलगर्जीपणा

April 9, 2009 7:46 AM0 commentsViews:

9 एप्रिलआसाम बॉम्बस्फोटात उल्फाचा अतिरेकी म्हणून चुकून प्रसिद्ध केलेला फोटो दहावीच्या विद्यार्थ्याचा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. गुवाहटी पोलिसांनी त्यांची चूक मान्य केली आहे. आसाममध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी दोघा संशयित उल्फा अतिरेक्यांचे फोटो प्रसिद्ध केले होते. पण त्यापैकी एक फोटो दहावीच्या विद्यार्थ्याचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आपली चूक मान्य केली आहे. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोतला मनोहारी राजबोंगशी हा विद्यार्थी असून तो बक्सा जिल्ह्यातल्या लखीपूर गावातला आहे. दुसरा एक संशयित बॉम्बर, दीप याच्यासोबत पोलिसांनी मनोहारीचा फोटो प्रसिद्ध केला होता. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर बॉम्बलस्फोट घडवण्यासाठी या दोघांनी गुवाहाटीत घुसखोरी केली होती, असा दावा पोलिसांनी केला होता. हे फोटोग्राफ इतक्या तातडीनं प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही आसाम पोलिसांचं कौतुक केलं होतं.

close