मोदी PM तर गुजरातचा CM कोण ?

May 13, 2014 1:36 PM0 commentsViews: 2960

56modi_meeting13 मे : लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केली या पोलमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार असं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आज (मंगळवारी) गुजरातच्या भाजप आमदारांची भेट घेत आहे.

या बैठकीत मोदींनंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर कुणाला नेमायचं यावर चर्चा होणार आहे. सध्या गुजरातच्या महसूल मंत्री आनंदीबेन पटेल या नव्या मुख्यमंत्री होऊ शकतात, असं बोललं जातंय. जर आजच्या बैठकीत निर्णय झाला तर 20 मेच्या आत गुजरातचे नवे मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात. भाजप नेते जरी म्हणत असले की, केंद्रीय संसदीय समितीच याचा निर्णय घेईल, तरी मोदींनी याबाबत भाजप नेतृत्व आणि संघाशी आधीच चर्चा केलीय, असं दिसतंय.

सौराष्ट्रातले नेते भिकूभाई दलसानिया यांचंही नाव चर्चेत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी ठरवण्यासाठी ही बैठक नाही तर गुजरातच्या कृषी महोत्सवाच्या नियोजनासाठी मोदी आज आमदारांना भेटणार आहेत, असं सांगण्यात येतंय. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींची शेवटची बैठक असेल असं सांगण्यात येतंय. तर गुजरातमध्ये भाजपच्या नेत्यांची मोदींच्या नेतृत्त्वात बैठक झाली मात्र ही बैठक नर्मदेच्या पाणीवाटपाबाबत आणि गुजरातच्या पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी होती असं स्पष्टीकरण मोदींनी ट्विट करुन दिलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close