नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक – ओबामा

May 13, 2014 1:55 PM0 commentsViews: 3003

obama-immigration-113 मे : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे. भारताच्या पुढच्या प्रशासनाबरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असंही ओबामा यांनी म्हटलंय.

सोमवारी मतदान संपल्यानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांनी पोस्ट पोल सर्व्हे, एक्झिट पोल सर्व्हे प्रसिद्ध केले आहे या सर्व्हेनुसार मोदींचं सरकार येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यानंतर पहिल्यांदाच बराक ओबामा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मी, भारतीय जनतेचं अभिनंदन करतो. लोकशाही पद्धतीनं इतिहासातली सर्वात मोठी निवडणूक घेऊन भारतानं जगासमोर एक उदाहरण ठेवलंय. गेल्या दोन दशकांमध्ये अमेरिका आणि भारताचे संबंध दृढ झाले आहेत. यामुळे आमचे नागरिक अधिक सुरक्षित आणि संपन्न झालेत. नव्या सरकारच्या स्थापनेबाबत आणि भारताच्या पुढच्या प्रशासनाबरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असं ओबामांनी स्पष्ट केलं.

तर अमेरिकेने मोदी व्हिसा नाकारला होता. त्यामुळे आता जर मोदींची सरकार आलं तर अमेरिका सरकार आपल्या धोरणात बदल करेल का हे पाहण्याचं ठरेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close