‘बाय बाय पीएम’, कर्मचार्‍यांनी दिला निरोप

May 13, 2014 6:04 PM1 commentViews: 3760

5pm_by_by3413 मे :13 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. तर दिल्लीत साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आवराआवरी करण्यास सुरुवात केली.

 

पंतप्रधानांचं कार्यालय असलेल्या साऊथ ब्लॉकमधल्या कर्मचार्‍यांनी आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एका छोट्याखानी कार्यक्रमात निरोप दिला. गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात कर्मचार्‍यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी सर्व कर्मचार्‍यांचे आभार मानले.

 

तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांचा निरोप समारंभ उद्या बुधवारी आयोजित केलाय.
दिल्लीत नवीन सरकार यायला आता फक्त आठवडा राहिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • rohit

    या शेवटच्या बैठकीत शेवटचा भ्रष्टाचार कारन अब कि बार मोदी सरकार

close