जेटलींची मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमनं

May 13, 2014 4:34 PM0 commentsViews: 1617

67jetliy_pm13 मे : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग लवकरच पंतप्रधानपदावरून पायउतार होत आहेत. आतापर्यंत त्यांच्यावर सतत टीका करणारे विरोधक आता त्यांचे गोडवे गात आहेत. भाजपचे अरुण जेटली यांनीही पंतप्रधानांचं खुल्या दिलानं कौतुक केलंय. त्याचवेळी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीकाही केलीे.

मनमोहन सिंग हे निर्विवादपणे सर्वोत्तम अर्थमंत्री होते. 1991 साली आर्थिक सुधारणेच्या पर्वाला मनमोहन यांच्यामुळेच सुरुवात झाली. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून त्यांना चांगला पाठिंबा मिळाला. मात्र मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी नेमण्याची घोषणा सोनिया गांधींनी केली होती.

त्यामुळे पंतप्रधानांना त्या मर्यादेतच काम करावं लागलं. गंभीर विषयांवर ते उत्तम चर्चा करायचे. मनमोहन सिंग हे विद्वान आहेत. पण ते नेता म्हणून कधीच समोर आले नाहीत. पंतप्रधानांचं मत कधी विचारातच घेतलं जात नाही असा समज झाला. स्वपक्षातल्या ज्येष्ठांना दुखवणं मनमोहन सिंग यांना कधीच जमलं नाही असं मत जेटली यांनी व्यक्त केलं.

  • +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close