देशभरातल्या विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा

April 9, 2009 2:54 PM0 commentsViews: 4

9 एप्रिल देशभरातली विमानतळं उडवून टाकू अशी धमकीची इ-मेल एअर इंडियाच्या एका कर्मचार्‍याला दोन दिवसांपूर्वीआली आहे. त्यामुळे देशभरातल्या विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा गृहमंत्रालयाने दिला आहे. हा धमकीचा मेल पाकिस्तानमधल्या रावळपिंडीतून पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 26/11 च्या हल्ल्यात ताज हॉटेल उडवून देण्याची धमकीही, याचं इ-मेल आयडीवरून आली होती. त्यामुळे आता एअरपोर्ट सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून महत्त्वाच्या एअरपोर्टवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसे आदेश केंद्रीय गृहखात्याने विमानतळ अधिकार्‍यांना तसंच विमानतळ सुरक्षा व्यवस्थेला दिले आहेत.

close