आघाडी भुईसपाट होईल -राजू शेट्टी

May 13, 2014 5:37 PM0 commentsViews: 3297

raju shetty on aap13 मे : देशात एनडीएला बहुमत मिळेल तर राज्यात महायुतीला 35 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भुईसपाट होईल असं भाकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.

तसंच आपण स्वत: आणि सदाभाऊ खोत निवडून जाऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस – राष्ट्रवादीला सत्तेचा माज भोवला आहे. कुंपणावर बसणार्‍यांना एनडीएमध्ये प्रवेश नाही असा टोला नाव न घेता राष्ट्रवादीला लगावला.

संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजलाय पण आपण हातकणंगलेमधून बाजी मारू तसंच नव्या सरकारमध्ये शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्नशील राहू असं मत शेट्टी यांनी पुण्यात आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close