पराभवाला पक्षच जबाबदार, काँग्रेसची तयारी

May 13, 2014 8:54 PM1 commentViews: 2558

56congress_413 मे : लोकसभा निवडणुकीच मतदान संपल्यानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांनी पोस्ट पोल सर्व्हेमध्ये मोदी सरकार येईल असा अंदाज व्यक्त केलाय जर हे अंदाज खरे ठरले तर काँग्रेसचं भवितव्य काय असेल असा प्रश्न आता निर्माण झाला. हा अंदाज खरा ठरला तर काँग्रेसला खरोखरच धोबीपछाड मिळेल.

आयबीएन नेटवर्क-आणि सीएसडीएसच्या पोस्ट पोल सर्व्हेनुसार काँग्रेसला केवळ लोकसभेच्या 100 जागा मिळतील असा अंदाज आहे. ही आतापर्यंतची काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी आहे. निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्यानंतर आता मुख्य प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे यासाठी दोषी कोणाला मानायचं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींना पराभवासाठी जबाबदार धरण्यापेक्षा संपूर्ण पक्षच पराभवाची जबाबदारी घ्यावी, राहुल गांधींचं नेतृत्व किंवा सरकारची कामगिरी असं, सोनिया गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचं कळतंय. राहुल गांधी टार्गेट होऊ नये म्हणून सरकारचा पराभव झाला हा मुद्दा अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात पक्ष कमी पडला असं सांगण्यात येतंय. पक्ष याच भूमिकेवर ठाम राहील. यानंतर काही पदांमध्ये बदल होतील. पण नेतृत्वाला धक्का बसणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  कॉंन्ग्रेसच्या पराभवाची कारणे:
  १) शासकीय कर्मचार्‍यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार
  २) नेत्यांनी केलेले घोटाळे
  ३) वाढती महागाई
  ४) स्वीस बॅंकेतील पैसे
  ५) जाती-धर्माचे राजकारण (जनतेत फूट पाडणे, वाद निर्माण करणे)
  ६) पाकिस्तानच्या व अतिरेक्यांच्या बाबतीत नरमाईचे धोरण
  ७) गुन्हेगारांना मदत करणे
  ८) पोलीस व सी.बी.आय.चा दुरूपयोग करणे
  ९) चार वर्षे मनमानी राज्यकारभार करून पाचव्या (शेवटच्या) वर्षी पोकळ घोषणा करणे
  पराभवाची ही कारणे स्पष्ट असूनसुध्दा इकडे दुर्लक्ष करून नेतेमंडळी चिंतन बैठक घेणार आणि वेगळीच कारणॆ शोधण्याचा प्रयत्न करणार.
  जनतेला आपण सहज फसवू शकतो असा नेत्यांचा समज झालेला होता. परंतु आताची जनता सर्व कांही समजते. त्यामुळे राजकारणात आता अ‍ॅक्टिंग करुन कांहीच उपयोग होणार नाही.

close