पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती

May 13, 2014 9:33 PM0 commentsViews: 1632

6758narendra_modi_postpoll201413 मे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर ‘अब की बार मोदी सरकार’ असा कौल सर्वच वृत्तवाहिन्यांच्या एक्झीट पोलनी दिला आहे. एनडीएला जवळपास 250 च्या पुढे जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पण एनडीएच्या विजयाचा फॅक्टर ठरला ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी.

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभेला सामोरं जाणार असा निर्णय घेतला आणि त्यानंतर सुरू झालं मोदी पर्व. गेल्या सहा महिन्यात ‘गल्ली ते दिल्ली’ ‘नमो नम:’ असाच सूर भाजपने लावला.  सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी म्हणजेच CSDS ने आयबीएन नेटवर्कसाठी पोस्ट पोल सर्व्हे घेतला या सर्व्हेमध्ये देशाच्या जनतेनंही मोदीच गारुड मान्य केलं असंच चित्र आहे.

पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती ही नरेंद्र मोदी यांनाच देण्यात आलीय. मागील वर्षी जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये नरेंद्र मोदींना 19 टक्के लोकांनी पसंती दिली होती. जशा जशा निवडणुकाजवळ येत गेल्यात त्याप्रमाणे टक्केवारीतही बदल होत गेला. जानेवारी 2014 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व्हेत ही टक्केवारी 34 झाली आणि मार्च महिन्यात 34 टक्क्यांवर पोहचली. मतदानानंतर हीच टक्केवारी दोनने वाढून 37 इतकी झाली.

मोदींच्या विरोधात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जेमतेम 15 टक्के इतकीच पसंती मिळाली. मागिल वर्षी जुलै महिन्यात ही टक्केवारी 12 होती ती जानेवारी 2014 ते मतदानानंतर 3 टक्क्यांने वाढून 12 वर पोहचली. त्यापाठोपाठ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फक्त 3 टक्के लोकांनी पसंती दिली. मायावती यांना 3 टक्के, मुलायम सिंह यांना 2 टक्के, अरविंद केजरीवाल यांना 2 टक्के आणि सलग दोन टर्म पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणारे मनमोहन सिंग यांना तर फक्त 2 टक्के जनतेनं पसंती दिली.

 

पंतप्रधानपदाची पसंती कुणाला ?

उमेदवार जुलै.13 जाने.14 मार्च.14 मतदानानंतर
नरेंद्र मोदी 19% 34% 34% 37%
राहुल गांधी 12% 15% 15% 15%
सोनिया गांधी 5% 5% 3% 3%
मायावती 3% 2% 2% 3%
मुलायम सिंह 2% 2% 2% 2%
अरविंद केजरीवाल 3% 2% 2%
मनमोहन सिंग 6% 3% 2% 2%

विविध वयोगटानुसार पंतप्रधानपदाची पसंती कुणाला ?

वयोगट नरेंद्र मोदी राहुल गांधी
18-22 वर्षे 44% 15%
23-25 वर्षे 41% 18%
26-35 वर्षे 39% 16%
36-45 वर्षे 36 % 15%
46-55 वर्षे 34% 15%
56+ वर्षे 31% 14%

महिला आणि पुरुषांमध्ये पंतप्रधानपदाची पसंती कुणाला ?

लिंग नरेंद्र मोदी राहुल गांधी
पुरुष 41% 17%
महिला 31% 14%

विभागनिहाय मतांची पसंती कुणाला ?

विभाग भाजप एनडीए काँग्रेस युपीए
उत्तर भारत 39% 6% 19% 2%
पश्चिम-मध्य भारत 47% 8% 29% 6%
दक्षिण भारत 16% 13% 23% 1%
पूर्व-पूर्वोत्तर भारत 29% 4% 18% 8%

ग्रामीण-शहरी भागांची मतं कुणाला मिळाली ?

विभाग भाजप एनडीए काँग्रेस यूपीए
ग्रामीण 33% 6% 22% 5%
शहरी 36% 7% 22% 1%

 

मोदींमुळे भाजपच्या मतदारांनी भाजपला कुठं किती मतदान केलं ?

कर्नाटक 57%
बिहार 44%
तामिळनाडू 42%
राजस्थान 42%
हरियाणा 36%
दिल्ली 33%
ओडिशा 30%
आसाम 29%

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close