सर्व दहशतवादी एकाच समुदायाचे का?- गिरीराज सिंह

May 14, 2014 11:53 AM1 commentViews: 998
Giriraj singhddd14 मे :  भाजपचे बिहारमधले नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत सर्व दहशतवादी एकाच समुदायातून का येत आहेत, असा प्रश्न विचारून त्यांनी पुन्हा एकदा वाद उपस्थित केला आहे.
यापूर्वी गिरीराज सिंह यांनी प्रचारादरम्यान भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्‍यांनी पाकिस्तानात जावं असं वक्तव्य गिरीराज सिंह यांनी असे वक्तव्य केलं होतं. यानंतर सर्व स्तराच्या राजकीय पक्षांकडून सिंह यांच्यावर टीका होत होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या ते जामीनावर कारागृहाबाहेर आहेत. आता गिरीराजसिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
गिरीराजसिंह म्हणाले,’एका विशिष्ट समुदायातले सर्वजण दहशतवादी नसतात, पण सर्व दहशतवादी एकाच समुदायाचे कसे’ असा प्रश्न विचारून त्यांनी पुन्हा एकदा वाद उपस्थित केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Swapnil S Bamhane

  एकदम बरोबर बोलले आहेत

  जय भवानी

  जय शिवाजी

  जय संभाजी

  जयतु हिंदुराष्ट्र.

close