टायटलर यांच्या क्लीनचीट प्रकरणाची सुनावणी 28 एप्रिलला

April 9, 2009 3:00 PM0 commentsViews:

9 एप्रिल जगदीश टायटलर यांच्या क्लीनचीट प्रकरणावरची सुनावणी 28 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 1984 मध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शीखविरोधी दंगे भडकवण्यात जगदीश टायटलर यांचा प्रमुख हात होता, असा आरोप त्यांच्यावर आहे. अशा दंगेखोराला सीबीआयने क्लीन चीट देऊन काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारीही देऊ केल्यामुळे सीबीआयच्या निकालाने शीख बांधवांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत होता. त्यांनी जगदीश टायटलर यांना उमेदवारी देऊ नये याकरता ठिकठिकाणी निदर्शनं केली होती. त्यात गृहमंत्र्यांवर पत्रकार परिषदेत जर्नेल सिंग या पत्रकाराने जोडा भिरकावून सीबीआयच्या कृत्यांचा निषेध केला होता. जर्नेल सिंगच्या या कृत्याने शीख समुदायाच्या असंतोषाला वाचा फुटली. शिख समुदायाने कालपासून पंजाब हरयाणात ठिकठिकाणी धरणं धरली होती.जगदीश टायटलर यांच्या विरोधातला शिखांचा वाढता रोष पाहता टायटलर यांनी स्वत:हून उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी सूचना काँग्रेसनं केली होती. दिल्ली हायकोर्टासमोर शीख समुदायाने जोरदार निदर्शनं केली आणि काहीजणांनी कोर्टात घुसण्याचाही प्रयत्न केला. कोर्टाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

close