अजित पवारच मुख्यमंत्री होणार -सुप्रिया सुळे

May 14, 2014 12:56 PM0 commentsViews: 4518

435sule5614 मे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचा वारसदार कोण, अजित पवार की सुप्रिया सुळे याची चर्चा नेहमीच होत असते. आता खुद्द सुप्रिया सुळे यांनीच त्याला विराम द्यायचा प्रयत्न केला आहे.

 

राज्यात अजितदादाच मुख्यमंत्री होणार. आमच्यात आजवर अनेकांनी भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच पवारांच रक्त आहे. कितीही प्रयत्न केला तरी आमच्यात वाद होणार नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खसदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. पत्रकार सचिन परब यांच्या ‘माझं आभाळ’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 

या प्रकाशन सोहळ्यात विधान परिषद विरोधीपक्ष नेते विनोद तावडे तसंम्च शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांच्या भाषणाआधी विनोद तावडे यांनी केलेल्या भाषणात महाराष्ट्राचा अखिलेश कोण असा सवाल केला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close