सोनिया गांधी परिवाराला लिट्टेकडून धोका नाही – लिट्टेचा सीएनएनआयबीएनला ईमेल

April 9, 2009 3:02 PM0 commentsViews: 4

9 एप्रिल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलेम म्हणजे लिट्टेकडून धोका नाही, अशा आशयाचा ईमेल सीएनएन आयबीएनला आला आहे. सोनिया गांधी यांच्यावर लिट्टेकडून हल्ला होऊ शकतो, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला होता. गृहमंत्रालयानं यासंबंधी सर्व राज्यांच्या पोलीस प्रमुखांना सूचनाही पाठवल्या होत्या. पण आपल्याकडून सोनियांना कुठल्याही प्रकाराचा धोका नाहीये, असं लिट्टेनं म्हटलंय. सोनिया गांधींच्या येत्या काळात महाराष्ट्र आणि दक्षिणेतल्या राज्यातही सभा आहेत. या सभांमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने त्या त्या राज्यांना दिले आहेत. सोनियांची काल बुधवारी थिरुवनंतपुरममध्ये सभा होती.

close