मुंडेंची नाराजी दूर,बैठकीला हजर

May 14, 2014 4:38 PM1 commentViews: 3502

55munde14 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानिमित्ताने भाजपने बैठकींचा सपाटा लावलाय. गुजरातमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बैठक होत आहे तर राज्यातही भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीच्या पत्रिकेत नाव नसल्याने भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहे. आपलं नावं पत्रिकेत वगळण्यात आल्यामुळ मंुडेंनी बैठकीकडे पाठ फिरवली. मुंडे नाराज असल्यामुळे त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. माधव भांडारी आणि गिरीश महाजन या नेत्यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आणि ते बैठकीला हजर झाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • am

    he is waste of leader who has done nothing.. why he is not able to build bjp in marathwada and western maharashtra… now he want to become union minister … go home

close