राजकीय नेते साईंच्या चरणी

May 14, 2014 5:08 PM0 commentsViews: 1540

14 मे : ‘लोकशक्तीवरची श्रद्धा आणि मतमोजणीपर्यंतची सबुरी’ शिर्डीच्या साईबाबांनी बहुदा सगळ्याच नेत्यांना हा मूलमंत्र दिला असावा. या निवडणुकीच्या काळात साईबाबाच्या दर्शनासाठी शिर्डीत राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या असल्याचं पाहायला मिळतंय.

काँग्रेस आणि शिवसेनेसाठी तर शिर्डीची जागा विशेष प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी आणि शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी आवर्जून साईबाबांचं दर्शन घेतलं. त्याशिवाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही साईबाबांच्या समाधीला वंदन केलं. एकंदरीत, निवडणुकीच्या निमित्ताने का होईना पण सगळ्याच पक्षांमधल्या राजकीय नेत्यांनी साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close