जगदीश टायटलर यांनी घेतली माघार

April 9, 2009 3:04 PM0 commentsViews: 6

9 एप्रिल जगदीश टायटलर यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा आज दिल्लीत पत्रकारपरिषदेत केली. अडचणीत आलेल्या काँग्रेसला टायटलर यांच्या या घोषणेने आधार मिळाला आहे. आता मी पक्षात रहायचंय की नाही हा निर्णय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा आहे, असं पत्रकारपरिषदेत म्हणत त्यांनी सोनिया गांधींच्या कोर्टात बॉल टाकला आहे. 1984 च्या दंगलप्रकरणी सीबीआयनं क्लीन चीट दिल्यानंतर शीख संघटनांनी या निर्णयाविरोधात निदर्शनं सुरू केली होती. त्यात आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसने जगदीश टायटलर यांना उमेदवारी दिल्यामुळे शीख संघटनांमधून संतापही व्यक्त केला जात होता. जर्नेल सिंगने गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर जोडा भिरकावला होता. हे पाहाता नैतिकतेच्या मुद्द्यावर टायटलर यांनी उमेदवारी मागे घ्यावी असा आदेश काँग्रेसने दिला होता.

close