विजयोत्सवासाठी गुलालाने ‘रंगले’ बाजार

May 14, 2014 6:00 PM0 commentsViews: 495

14 मे :कोण पडणार आणि कोण तरणार याची खात्री कुणीच देऊ शकत नाही पण या निवडणुकीत विजय कोणाचाही होवो, काहींचा फायदा नक्कीच होणार आहे, त्यातलेचं एक म्हणजे गुलालाचे व्यापारी. विजयाचे प्रतिक मानल्या गेलेल्या गुलालाला मतमोजणीच्या दिवशी मोठी मागणी असते. त्यामुळे परवावर आलेल्या मतमोजणीसाठी गुलालाची दुकाने गुलाबी झाली आहेत.

गुलालातही पुणेरी गुलाल सरस मानला जातो. त्याची किंमत आहे 40 रुपये किलो. भेसळीचा जमाना असल्यानं, रांगोळी मिस्क गुलाल सर्वात स्वस्त. त्याची किंमत 20 रुपये किलो. पण बहुतांश कार्यकर्त्यांची पसंती असते ती रेग्लुलर गुलाला. त्याची किंमत यंदा आहे 30 रुपये किलो. 1 किलोच्या पिशव्यांपासून 20 किलोंच्या गोणींपर्यंत हा गुलाल उपलब्ध होतो.

बर्‍याच कार्यकर्त्यांनी गुलालाची ऑर्डरही दिलीए पण कोणत्या पक्षाच्या ते मात्र गुलदस्त्यात आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close