टीम मोदीमध्ये राजनाथ यांना गृह तर जेटलींना अर्थ खाते?

May 14, 2014 7:25 PM0 commentsViews: 5370

456BJP_Meet_PTI14 मे : लोकसभा निवडणुकीचा निकालाला आता काही तास उरले आहे. भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यात भावी सरकारची बैठक झाली. गुजरातच्या गांधीनगरमध्ये भाजपच्या नेत्यांची महत्वाची बैठक झालीय. या बैठकीत सत्तास्थापनेनंतर जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. एनडीएला बहुमत मिळाल्यास 20 मेपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

भाजपचे नेते अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशींना महत्त्वाची खाती मिळणार आहे. तर नितीन गडकरींची रेल्वे किंवा पायाभूत सुविधा खाते मिळणार असल्याची चर्चा आहे.

पण या बैठकीला नाराजी किनार लागला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज नाराज असल्याचं कळतंय. त्यामुळे स्वराज यांनी नाराजी व्यक्त करत थेट भोपाळ गाठले होते. मात्र पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्वराज तयांची भेट घेतली पण नाराजी दूर करू शकले नाही. गेल्याकाही दिवसांपासून सुषमा स्वराज या पक्षात एकाकी पडल्याचं चित्र आहे. पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमध्येही त्या फारशा दिसत नाहीत. त्यामुळेच त्यानी या बैठकीकडेही पाठ फिरवली. या बैठकीला राजनाथ सिंह, नितीन गडकरी, नरेंद्र मोदी, अरुण जेटली उपस्थित आहे. या बैठकीत कुणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कुणाला कोणतं मंत्रिपद मिळू शकतं ?

  • - अरुण जेटली – अर्थ किंवा परराष्ट्र खातं
  • - मुरली मनोहर जोशी – परराष्ट्र विभाग किंवा अर्थ
  • - राजनाथ सिंह – गृह
  • - सुषमा स्वराज – संरक्षण
  • - जन. व्ही.के. सिंग – संरक्षण राज्य मंत्री
  • - नितीन गडकरी – रेल्वे किंवा पायाभूत सुविधा, गडकरी गृहखात्यासाठी आग्रही असल्याचीही माहिती
  • - राम विलास पासवान – आरोग्य किंवा कृषी

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close