एनडीएमध्ये जाणार नाही -पटेल

May 14, 2014 9:25 PM0 commentsViews: 990

14 मे : भाजप आता सत्तास्थापनेच्या तयारीला लागला. माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडून एनडीएमध्ये येतील अशा अफवांना उत आला होता त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी पडदा टाकला. आपण राष्ट्रवादीमध्ये राहणार असून एनडीएमध्ये जाणार नाही असं स्पष्टीकरण पटेल यांनी दिलं. तसंच जर एखादे चांगले सरकार जर येत असेल तर देशाच्या विकासासाठी चांगली गोष्ट आहे असंही पटेल म्हणाले. पटेल एनडीएमध्ये जाणार या बातमीचं राष्ट्रवादीनं खंडन केलंय. हे खोडसाळपणाचं वृत्त असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय. नरेंद्र मोदींची स्नूपगेट प्रकरणी चौकशी करायला प्रफुल्ल पटेलांनी ठाम विरोध केला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close