घर घर की पसंत…हमारी नॅनो!

April 9, 2009 4:57 PM0 commentsViews: 4

9 एप्रिलदेशभरातले सर्व नॅनोप्रेमी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, त्याप्रमाणेच आजपासून नॅनोच्या बुकिंगला सुरूवात झाली आहे. देशभरात अनेक ठिकाणी आज नॅनो बुक करण्यासाठी ग्राहकांनी चौकशीसाठी ऑटो शोरुम्सना भेट दिली. विशेष म्हणजे नॅनोची किंमत बजेटमध्ये बसणारी असल्यामुळे अनेकांनी रोख रक्कम देऊन हे बुकिंग केलं. नॅनोचे फॉर्म क्रोमा, स्टेट बँकेतही उपलब्ध आहेत . या फॉर्मची किंमत तीनशे रुपये आहे. येत्या पंचवीस तारखेपर्यंत ग्राहकांना नॅनोचं बुकिंग करता येणार आहे. पहिल्या अलॉटमेंटमध्ये एक लाख नॅनो ग्राहकांपर्यंत पोचवण्याची तयारी कंपनीनं दाखवली आहे. नॅनोचं बुकिंग करण्यासाठी सुरुवातीला ग्राहकांना नव्वद हजार ते एक लाख चाळीस हजार रुपये बुकिंगच्या स्वरुपात द्यावे लागतील.टाटा मोटर्सनं नॅनोच्या फायनान्ससाठी एकूण अठरा़ बँकांशी करार केला आहे. टाटा मोटर्सच्या अनेक शोरुम्समध्ये तसंच डिलर्स शोरुम्समध्ये ग्राहकांनी बुकिंगसाठी आज गर्दी केली होती. नॅनोसाठी कंपनीनं प्रमुख सरकारी बँकाकडे कर्ज उपलब्ध होईल अशी सोय केली आहे. युनियन बँक,युको बँक,कॉर्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल बँक अशा विविध सरकारी बँकांकडे नऊ ते पावणेबारा टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध होणार आहे. मात्र बँका या रकमेसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार आहेत. नॅनो ग्राहकांसाठी कंपनीनं काही विमा कंपन्यांसोबत करार केला आहे. नॅनोचा विमा काढण्यासाठी साडेतीन हजार रुपये भरावे लागतील. पण नेटवर्क 18ला मिळालेल्या माहितीनुसार नॅनोचं उत्पादन पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं समजलं आहे. उत्तराखंड इथल्या पंतनगरमध्ये नॅनोचं उत्पादन दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. टाटा मोटर्सनं मात्र ही बातमी फेटाळली आहे.

close