राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये येतील -मुंडे

May 14, 2014 10:37 PM0 commentsViews: 9305

14 मे : राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येऊ शकतात, निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोलमाडतील आणि अनेक नेते भाजपमध्ये येतील असे संकेत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिले आहे. एकाप्रकारे मुंडे यांनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव न घेता सूचक वक्तव्य केलंय. तसंच केंद्राप्रमाणे राज्यातही परिवर्तन होईल आणि एनडीएचंच सरकार येईल असा विश्वासही गोपीनाथ मुंडेंनी व्यक्त केला. मुंबईत भाजप प्रदेश कार्यकारणीची विशेष बैठक झाली. या बैठकीला गोपीनाथ मुंडे सुरुवातीला उपस्थित नव्हते. पण नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर ते बैठकीला आले. शिवसेनेनं भाजप उमेदवारांसाठी प्रचार केला नसल्याचा सूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून बैठकीत उमटला. तसंच महाराष्ट्रात लवकरच ज्याच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढली जाईल त्या नेत्यांचं नाव घोषित करणार, असं भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी सांगितलंय. नेता घोषित केल्याने राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा विधानसभा निवडणुकीत यश मिळाला. लोकसभा निवडणुकीतही आधीच नेता निवडल्यामुळे यश मिळेल त्यामुळे आता विधानसभेसाठी नेतृत्वाची लवकरच घोषणा केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close