पंतप्रधानांना बाय बाय न करताच राहुल गांधी विदेश दौर्‍याला रवाना

May 14, 2014 11:04 PM1 commentViews: 2948

rahul_gandhi_pm_farewell dinner14 मे : गेली दहा वर्ष देशाचे पंतप्रधानपद भुषवणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बुधवारी संध्याकाळी दिल्लीत दस जनपथवर निरोप देण्यात आला. पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं. पण या निरोप समारंभाला राहुल गांधी यांनी दांडी मारली. राहुल गांधी परदेशात गेल्याचं सांगण्यात येतंय. तसंच या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या बाजूने निकाल लागला नाही तरी त्याचा दोष पंतप्रधानांना देऊ नये असे आदेशही सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे पंतप्रधानांनी दिल्लीत आवारा-आवरी सुरू केलीय. मंगळवारी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानांचं कार्यालय असलेल्या साऊथ ब्लॉकमधल्या कर्मचार्‍यांनी निरोप दिला. देश कठीण परिस्थितीत असताना यूपीए-1 आणि यूपीए-2 मध्ये मनमोहन सिंग यांनी अत्यंत चांगलं नेतृत्व केलं अशा शब्दांत त्यांचा काँग्रेस नेत्यांनी गौरव केला. त्यानंतर बुधवारी काँग्रेसपक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी खास निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या समारंभाला यूपीए सरकारचे सर्व मंत्री, नेते आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर याही उपस्थित होत्या. पण राहुल गांधी अनुउपस्थित राहिल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले. यावर बोलण्यासाठी काँग्रेसचा कोणताही नेता तयार नाही. असं सांगण्यात येतंय की, राहुल यांनी अगोदरच मनमोहन सिंग यांची भेट घेऊन निरोप दिला आणि विदेश दौर्‍याला निघून गेले. राहुल यांच्या अचानक विदेश दौर्‍यावर निघून जाण्यामुळे चर्चेला उधाण आलंय. मात्र काँग्रेसने यावर राजकारण करु नये असं म्हटलंय. दरम्यान, राहुल गांधी आणि सोनिया गांधी निकालाच्या दिवशी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतील असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sachin Nalawade

    Rahul la tond dhakvayala jaga rahali nahi ata!

close