हॅलो हॅलो एअरसेल…!

April 9, 2009 4:57 PM0 commentsViews: 11

9 एप्रिलमुंबईतल्या मोबाईल मार्केटमध्ये आता आणखी एका मोबाईल ऑपरेटरची भर पडली आहे. तामिळनाडूनची नंबर वन मोबाईल सर्व्हिस ऑपरेटर कंपनी एअरसेलनं मुंबईत पदार्पण केलं आहे. सुरूवातीला एअरसेलच्या ग्राहकांना फक्त प्री-पेड कनेक्शन उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच्या दोन आठवड्यातच पोस्टपेड कनेक्शनही सुरू केली जातील. मुंबईतली ही सातवी मोबाईल सर्व्हिस ऑपरेटर कंपनी आहे. मुंबईत ग्राहकांना मोबाईल कनेक्शनसाठी आता आणखी एक ऑप्शन मिळाला आहे . ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा कंपनीनं व्यक्त केलीय.

close