पाहा मोदींचा पुढच्या दोन दिवसांचा प्लॅन !

May 15, 2014 1:25 PM0 commentsViews: 3992

4narendra_modi_meeting415 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता 24 तासांपेक्षाही कमी वेळ राहिला आहे आणि निकालाचा कल बघता सत्ता स्थापनेच्या दिशेनं भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुढील दोन दिवसांचा प्लॅन आखला आहे. उद्या निकालाच्या दिवशी नरेंद्र मोदी गुजरातमध्ये गांधीनगरमधल्या घरी निकालावर नजर ठेवून राहतील. निकाल जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतली त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता बडोद्यामध्ये भव्य अशी विजयी रॅली काढण्यात येणार आहे.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी 17 मे रोजीही सकाळी अहमदाबादमध्ये रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर मोदी दिल्लीकडे कूच करतील. दिल्ली मोदींचं भव्य स्वागत होणार आहे. लाखो रुपयांच्या फटाकेबाजी, फुलांच्या पाकळ्यांचं उधळण करून मोदींचं स्वागत करण्याचा प्लॅन दिल्ली भाजपने आखला आहे.

त्यानंतर दुपारी 2.30 वाजता भाजपच्या मुख्यालयात मोदींचा सत्कार होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता भाजपच्या संसदीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी मोदी वाराणसी रवाना होतील. वाराणसीत पोहचल्यानंतर ते गंगा आरती करतील आणि आरतीनंतर दिल्ली किंवा अहमदाबादला परतणार आहे असं सांगण्यात आलंय.

नरेंद्र मोदींचा दिनक्रम

निकालाच्या दिनी

 • - संध्याकाळपर्यंत गांधीनगरमधल्या घरी
 • - संध्याकाळी 5 वाजता आईला भेटणार
 • - संध्याकाळी 7 वाजता बडोद्यात रॅली
 • 17 मे
 • - सकाळी अहमदाबादमध्ये रॅली
  – दुपारी 12 वाजता दिल्लीला जाणार
  – दुपारी 2.30 वाजता भाजपच्या मुख्यालयात सत्कार
  – संध्याकाळी 5 वाजता भाजपच्या संसदीय समितीची बैठक
  – संध्याकाळी वाराणसीला जाणार, गंगा आरतीला हजेरी
  – आरतीनंतर दिल्ली किंवा अहमदाबादला परतणार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close