कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाहीच !

May 15, 2014 2:11 PM0 commentsViews: 1578

467mamata_SP_bjp15 मे : निकालाआधीच भाजपची लगीनघाई सुरू झालीय. भाजपच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून यासाठी भेटी-गाठी आणि बैठकांचं सत्र सुरू झालंय. एक्झीट पोलमध्ये मोदी सरकार येणार असा कौल देण्यात आलाय त्यामुळे प्रादेशिक पक्षांनीही एनडीएकडे हात पुढे सरसावला आहे. बिजू जनता दल आणि अण्णा द्रमुकने पाठिंब्याचे संकेत दिले आहे पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काहीही झालं तरी पाठिंबा देणार नाही अशी कडक भूमिका घेतली आहे.

निकालनंतर एनडीए सरकार जरी आलं त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही आणि त्यांना बहुमतासाठी आमच्या पाठिंब्याची गरज भासली तर कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही असं ममतांनी सांगितलं. त्यांच्यापाठोपाठ समाजवादी पक्षानेही ममतादीदींची भूमिकेची रीघ ओढत पाठिंबा देणार नसल्याचं सांगितलंय.

प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी असा सामना रंगला होता. एक्झीट पोलमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा दाखवण्यात आल्या आहे तर तृणमूल काँग्रेसला 25 ते 30 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. प्रादेशिक पक्षांमध्ये तृणमूलला सर्वाधिका जागा मिळतील त्यामुळे कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी जागा कमी मिळाल्या तर सर्वात पहिले हे ममतादीदींना साकडं घालावं लागणार आहे. त्यामुळे ममतांनी अगोदरच पाठिंबा न देण्याची भूमिका जाहीर केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close