सोशल मीडियातही ‘मोदी सरकार’

May 15, 2014 4:21 PM0 commentsViews: 790

modi twiter

15 मे : यंदाची निवडणूक अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरलीय पण यंदाच्या या निवडणुकीत सोशल मीडियाचाही मोठा हातभार लाभला. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स आणि यू ट्यूबचा राजकीय पक्षांनी पुरेपूर वापर केला. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी तर बाजी मारलीच पण सोशल मीडियावरही मोदींचा दबदबा कायम राहिला. सोशल मीडियावर प्रचार मोदींनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर मात केलीय.

आपली मतं लोखो-करोडा लोकांपर्यंत एकाचं वेळी एकाचं क्लिकवर पोहोचवण्यासाठी बहुदा सगळ्याचं राष्ट्रीय पक्षांनी सोशल मीडियावर करोडो रूपये खर्च केले. या निवडणुकीत मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजेचं 12 मे पर्यंत 5कोटी 60 लाख ट्विट्स पोस्ट केले गेलेत असं एका सर्वेक्षणात पाहायला मिळालं. सर्वेक्षणानुसार निवडणूक काळातील भारतीय ट्विटरची तुलना केवळ विंटर ऑलिंपिक ट्विटर सोबतच होऊ शकते. या काळात नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटर टिवटिवीमध्ये काँग्रेस नेते मागेच राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं पण प्रचाराबरोबरच ट्विटरमध्येही नरेंद्र मोदींची आघाडी पहायला मिळाली. एकूण ट्विटरच्या तुलनेत नरेंद्र मोदींविषयीची ट्विटर 20 टक्के होती.

निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदींचे ट्विटरवर एकूण 30 लाखांपेक्षा जास्त फॉलोव्हर झाले आहेत आणि अजूनही ते सुरू आहे तर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे 15 लाखांपेक्षा जास्त फॉलोव्हर आहेत. तर काँग्रेसची याबाबतीत पाटी कोरीच आहे. जिथे मोदींनी ट्विटर आणि इतर माध्यमांचा पुरेपूर वापर केला तिथे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा तर ट्विटर अकाऊंटचं नाहीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close