पत्रकाराने आक्रमकता दाखवणं चूकच – जर्नेल सिंग

April 9, 2009 5:02 PM0 commentsViews: 4

9 एप्रिल पत्रकाराने आक्रमकता दाखवणं चूकच आहे, असं गृहमंत्र्यांना जोडा मारणारा पत्रकार जर्नेल सिंग म्हणाला आहे. आयबीएन लोकमताला दिलेल्या खास मुलाखतीत त्याने म्हटलंय. 1984 च्या शीख विरोधी दंगलीत जगदीश टाईटलर यांना निर्दोष ठरवण्यासंदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्याने गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर जोडा फेकून मारला. जर्नेल सिंगच्या त्या कृत्याने भारताचं राजकारण चांगलंच ढवळून गेलं. पंजाबातल्या शिरोमणी अकाली दलानं जर्नेलसिंग यांचं कौतुक करून त्यांना दोन लाखांचं बक्षीस जाहीर केलं. तर भारतीय जनता पक्षानं जर्नेलसिंग मुद्द्यावर काँग्रेसला जोरदार फटकारलं. सिंग यांचं कृत्य चुकीचं आहे. पण काँग्रेसनं शिखांबद्दल जी अनास्था दाखवलीय, त्यामुळंच हे सारं घडलंय, असा टोला भाजपनं लगावला. तर काँग्रेस मात्र बचावाच्या पावित्र्यात होता. या विषयाचं राजकारण करू नये, असं त्यांनी आवाहन काँग्रेसनं केलं होतं. जर्नेलसिंग यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणार नसल्याचंही नमूद केलं. येत्या निवडणुकांमध्ये पंजाबमध्ये हा मुद्दा चांगलाच गााजण्याची शक्यता आहे. गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर जोडा फेकून वादाचा विषय बनलेले पत्रकार जर्नेलसिंग यांच्याशी केलेली बातचीत पाहण्यासाठी व्हिडिओ बघा.

close