तिवारी अखेर बोहल्यावर चढले

May 15, 2014 4:28 PM0 commentsViews: 1588

nd tiwari

15 मे : काँग्रेस नेते एन. डी. तिवारी यांनी उज्ज्वला शर्मा यांच्याशी अखेर विवाह केला आहे. एन. डी. तिवारी 88 वर्षांचे आहेत. त्यांचा मुलगा रोहित शेखरने एन. डी. तिवारी हेच आपले वडील आहेत,असं म्हटलं होतं. या प्रकरणी रोहित शेखर आणि त्याच्या आई उज्ज्वला शर्मा यांनी कायदेशीर लढाई दिली होती.

एन. डी. तिवारी यांच्या लखनौमधल्या घरासमोर उज्ज्वला शर्मा यांनी निदर्शनंही केली होती. त्यानंतर तिवारींनी रोहित त्यांचाच मुलगा म्हणून स्विकार केलं आणि आज एन. डी. तिवारी यांनी उज्ज्वला शर्मा यांच्याशी विवाह केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close