टीम इंडिया मायदेशी : क्रिकेट चाहत्यांनी केलं जल्लोषात स्वागत…

April 9, 2009 5:05 PM0 commentsViews: 6

9 एप्रिल न्यूझीलंडचा क्रिकेट दौरा गाजवणारे भारताचे क्रिकेट स्टार मायदेशी परतले आणि अपेक्षेप्रमाणे या हिरोंचं स्वागतही जल्लोषात करण्यात आलं. ज्या ज्या एअरपोर्टवर त्यांनी पाऊल ठेवलं त्या त्या ठिकाणी भारतीय क्रिकेटवेड्या प्रेक्षकांनी त्यांना मिठ्याच मारल्या तर उतावळे पत्रकारही त्यांच्याशी बोलायला धडपडत होते. धोणीच्या या टीमने 41 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकलीय. आणि त्यानंतर टीम पहिल्यांदाच भारतात परतलीय. या स्वागताने खेळाडूंही आनंदात होते. 'वन-डे आणि टेस्टमध्ये सगळ्याच प्लेअर्सचा परफॉमन्स चांगला झाला. खूप दिवसांनंतर टीमने मोठा विजय मिळवलाय. सीरिज जिंकण्यापूरतीच नाही पण क्वालिटी क्रिकेट खेळल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलाय,' असं यावेळी मिस्टर कूल राहूल द्रविडने सांगितलं. त्यातच भारतीय टीममधल्या 5 जणांचा समावेश 2008च्या विस्डेन टेस्ट टीममध्ये झालाय. अशाने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितलं. एकंदरीत 41 वर्षांनंतर टीमने न्युझीलंडमध्ये इतिहास घडवला जणू त्याची ही पावतीच आहे.

close