डी-कंपनीचा शूटर रशीद मलबारीच्या वकिलाची हत्त्या

April 10, 2009 6:55 AM0 commentsViews: 2

10 एप्रिल छोटा शकीलच्या गँगचा शूटर रशीद मलबारी याच्या वकिलाची हत्त्या झाली आहे. छोटा राजन गॅंगचा रवी पुजारी यानं या हत्त्येची जबाबदारी घेतलीय. एका टीव्ही चॅनलला त्यानं ही माहिती दिली आहे. भाजपचे युवा उमेदवार वरूण गांधी यांच्या हत्त्येचा कट मलबारीने रचला होता. आपल्याच गँगच्या लोकांनी मलबारीचा वकील नौशाद खाशीमवर गोळीबार केल्याचं त्यानं सांगितलंय. डी कंपनीशी संबंधित कोणतीही केस घेऊ नये, असा इशारा आपण त्याला दिला होता, असं पुजारीनं म्हटलं आहे. त्याला ठार मारून आपण देशसेवा करत असल्याचा दावा त्यानं केलाय. डी कंपनी संपवण्याचा आपला इरादा असल्याचं पुजारीनं म्हटलं आहे. डी कंपनीचे आणखी सदस्य आपल्या हिटलिस्टवर असल्याचं त्यानं सांगितलंय.

close