एमडीएमचे नेते वायको यांच्याविरोधात तामिळनाडू पोलिसांची कारवाई

April 10, 2009 8:31 AM0 commentsViews: 42

10 एप्रिल लिट्टेच्या बाजूनं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी एमडीएमचे नेते वायको यांच्याविरोधात तामिळनाडू पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हिंसाचाराला चिथावणी दिल्या प्रकरणी वायको यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी वायको दोषी ठरल्यास त्यांना जन्मठेपही होऊ शकते. लिट्टेप्रमुख प्रभाकरनला धक्का पोहोचल्यास तामिळनाडूत रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा वायको यांनी काल गुरुवारच्या सभेत दिला होता. श्रीलंकेतल्या तामिळांना स्वतंत्र प्रदेश मिळायलाच हवा, असंही त्यांनी म्हटलं होतं. आणि केंद्र सरकारनं श्रीलंकेतल्या संघर्षात मध्यस्थी केली नसल्यास भारत एकसंध राहणार नाही, अशी मुक्ताफळंही वायकोंनी उधळली होती. एकंदरीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत पुन्हा भाषेच्या नावावर राजकारण सुरू झालं असल्याचं दिसून येत आहे.

close